बाप….

किती जळले काळीज माझे…
मांडु कसं शब्दात मी…
पाहुनी प्रत्येक बालकास…
अश्रूनी नाहलोच सदयव मी…
ठेविले मजला तुझ्या पासून दूर सदा…
प्रत्येक चांदण्या मोजीत कादली असंख्य रात मी….
आईला दिला मातुतवाचा वरदान तु…
व्याकुळलेलया बापाला वनवासाचा क्षाप का दिलास तु…
हरवलं ‌क्षण सारं… सांडले ओंजळीतुनी….
क्षापीत कुमाराच‌े प्राण गुंतले त्यांच्या पिलाजवळी…
कंठ दाटूनी जीव कोमेजतो…अश्रूंचा पुर कोसळतो…
माझ्या रीदयावीना जगण्याचा अर्थ नाही ऊमजे मजला…
किती काळ वाट पाहु..
शिणले काळीज है….
प्रत्येक बालकांमध्ये दिसे निरागस रूपा तुझं….
होईल वास्तवाशी जाणीव… किंवा ठरवतील करंटा मजला…..
निसर्गाला ठाऊक आहे कीती तळमळला बाप तुझा..
जाणशील शबदरूपी मन माझे….
असेल किंवा नसेल मी… खरंपणा माझा कसा मांडु तुझ्या पुढे…
आकाशगंगेतुन बरसेल माझ्या खरेपणयाचे दाखले…
एकच मागणं देवा…घाल पदरात माझ्या…
माझ्या लेकरांच्या पोटी जन्मास घाल माला….
जगु दे क्षण सुखाचे चार घतका तरी…
रक्ताताळलेलया काळजाला मीलुदे मायेची सावली….

निर्भय सुधीर पिंपळे

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started