हातचं राखून जगणं
मला कधी जमलेचं नाही..
प्रेम केलं अंतरंगाला स्मरून…
स्वतः आधी तुझाचं विचार स्मरून गेला प्रत्येक वेळी….
माझ्या मनास भावले ते सर्व तुझ्यावर उधळले…
स्वतःच्या इच्छांना बगल देऊन
तुला सावरणयात आनंद गवसला…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही..
हातचं राखून जगणं मला कधी जमलेचं नाही….
नेसवताना साडी प्रत्येक मिरीत जिव गुंतला….
पदरावरील मोर माझ्या संगे डोलू लागला…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
ओठावरती लाली सजताना….
गाली माझ्या रंग बरसे…अंगणीत नजरा तुझ्यावर रोखे…जीव कासावीस होतो…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
केसात तुझ्या माळला मदनबाण
वसंत फुलताना माझ्या हृदयी… त्या सूगंधात मी नहालो तुला हे कधी दिसलाचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
निजताना अलगद केलेल्या हाताच्या उशीची ऊब…
तुझ्या काळजाला शिवलीचं नाही..
काळजीने मन बेचैन राहीले हे तुला उमगले नाही..
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
तुझ्यासाठी बनवलेल्या प्रत्येक पदार्थ तु चाखताना..
तृप्तीने आलेला ढेकर तुला कधी जाणवलाचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
शब्द बोचरे माझे तुला कधी रुचले नाही..
माझ्या प्रेमाचा झरा तुला कधी तृप्त करू शकलाचं नाही….
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
काळजीने डोळया वाटे ओघळलेले पंचप्राण तुला कधी कळलेच नाही….
मला कधी हातचं राखून जगणं जमलेचं नाही…
आज देखील तुझ्यासाठी आसुसलेला जिव जिवंत ठेवतो मला…
कधी जगणं शक्य आहे का शरीराचे आत्म्याविना….
प्रेम यातलं तुला कधी उमजलेचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
हृदयातील प्रत्येक स्पंदनात स्वरांचा ध्यास आहे….
हे तुला न समजणे हा नियतीचा खेळ आहे….
तुला माझ्या अंतरंगातील रंग कळू शकले नाहीत….
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
निर्भय सुधीर पिंपळे
