पोळले…

चंद्रभागेच्या वाळवंटी पाय पोळले माझे…
पोळलेल्या मनातले दुःख काय वेगळं होते…
तप्त उन्हात रणरण जळता…
तुझी आठवण बिलगुनी जाते…
तूही असेच जाळले मजला…
ग्रीष्माने जाळल्या जसा कळ्या दुपारी…
प्राणांतिक तयाचे हृदय विवळले…
माझे दुःख काही वेगळे नव्हते…
रक्ताळलेले काळीज घेऊनी मी समोर तुझ्या कोसळलो..
तु कणखर खडका प्रमाणे मौन बाळगून होतीस…
याच मौनातुनी कीतीक ऋतु कोमेजून हरपूनी गेले
वसंतातही कळ्या-फुलांनी प्राण त्यागीले होते…
अहंपणाच्या काळवंडल्या संध्याकाळी…
फुले गळुनी गेली…
निरांजन ऊजळता देवारी…
पण तुळस करपुनी गेली…
माझे ही हृदय जळूनी
उरले आत तप्त निखारे..
मृगजळ होते सारे ज्यावर हृदय भाळले होते…..

निर्भय सुधीर पिंपळे

2 Replies to “पोळले…”

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started