मी रोज भेटेन तुला….
सुर्याच्या पहिल्या किरणा समवेत….
अलगद बिलगेल तुजला कोवळ्या मिठीतून…. मी रोज भेटेन तुला….
तु सजवशील लाली ओठावरती….
तो रंगलेल्या ओठावरील प्रेमाचा रंग मीचं होतो….
मी रोज भेटेन तुला….
काजळ रेखाटताना डोळ्यांवरती….
काळ्या रंगाच्या अडून दृष्ट काढीत होतो….
मी रोज भेटेन तुला….
माळशील गजरा तु केसात….
त्या अविरत सुंगधातून मीचं बरसत होतो….
मी रोज भेटेन तुला….
तु आरश्यात स्वतःला निहारशील….
दिसेल तुला जी छबी ते माझ्या अंतरीचे प्रतिबिंब….
मी रोज भेटेन तुला….
देवाकडे तु नतमस्तक होशील….
तुझ्या प्रार्थने समवेत मी मम सदैव म्हणतो….
मी रोज भेटेन तुला….
तु ज्यावेळी हतबल होशील….
त्या आधाराच्या पाठीशी प्रेमाची ऊब सदैव मीचं….
मी रोज भेटेन तुला….
निजशील शांतपणे तु रात्री….
आभाळीचा चंद्र होऊनी मीचं शीतलता बरसतो….
निर्भय सुधीर पिंपळे
