कातरवेळी दिवेलागणीला मनातले निरांजन पुन्हा उजळले…
करपली तुळस अंगणी आणि जाईचा हरवला सुगंध…
पुन्हा नव्याने श्वास थबकला…
पुन्हा आशांना फुटली पालवी…
तारकांनी सजला आसमंत…
मी पुन्हा नव्याने स्वप्न रेखाटली….
सरता सरता रात्र हरवली…
स्वप्नांच्या मनोरथांनी गाठले आसमंत…
सुर्यदयला पापणी मिटतास्…
कोसळले सारे एका क्षणात…
पुन्हा वाट पाहतो कातरवेळेची….
पुन्हा अंतरीचे निरांजन हाती…
निर्भय सुधीर पिंपळे
