आयुष्याच्या वाटेवरती सरता सरल्या सुखदुःखाच्या घटिका…
अलगद मागे वळून पाहता…
पोहचले सतरीच्या मी घरात…
अगणित पावसाळे… अगणित चातके…
सुसाट वार्याच्या झोक्यात…
उभी राहिले पाय रोवूनी…
संस्कारांच्या शिदोरीवर जीवन जगले मी स्वाभिमानाने…
उदरी उमललेल्या फुलांना देऊ शकले यशाची शिदोरी…
सगेसोयरे सगळेचं आपले…
प्रेमाने फुलवली नाती…
आज मागे डोकावताना सगळेचं आहेत उभे पाठीशी…
संसाराचा गाडा नेला अलगद तडीस मी…
माण्सातल्या देवाची सोबत लाभली जगण्यासाठी…
आज तृप्त आनंदी समाधानी जगे मी…
नातवंडांच्या सोबतीत जगते बालपण पुन्हा नव्याने मी…
थकले शरीर जरी…
मंदावत चालली दृष्टी…
सार्यांचा प्रेमाच्या ऊबेत…
सुखात झाली संध्याकाळ ही…
खूप गवसले…थोडे हरवले…
आयुष्याच्या वाटेवरती प्रेमाची बरसात नव्हती कमी कधी…
अगणित अनुभव अगणित परीक्षा लढले माझ्या युद्ध सामर्थ्याने मी…
आज थोडा विसावा घेऊनी डोकावते भूतकाळात मी…
आयुष्याच्या पारडयात दुःख होते थोडे उजवे…
त्याच्यामुळे भोगू शकले सुखाची ऊब मी…
शांत, सबुरी, सत्य, निष्ठा…
कर्तव्याच्या डोंगर सहज पेलला दोहीवर मी…
कर्तव्य केली पार सारी…
आता निवांत वेळ सोबती…
आठवणींच्या हिंदोळ्यात विसावते सुखात मी…
निर्भय सुधीर पिंपळे
