
मी रोज….

मी रोज….
मी रोज भेटेन तुला….
सुर्याच्या पहिल्या किरणा समवेत….
अलगद बिलगेल तुजला कोवळ्या मिठीतून…. मी रोज भेटेन तुला….
तु सजवशील लाली ओठावरती….
तो रंगलेल्या ओठावरील प्रेमाचा रंग मीचं होतो….
मी रोज भेटेन तुला….
काजळ रेखाटताना डोळ्यांवरती….
काळ्या रंगाच्या अडून दृष्ट काढीत होतो….
मी रोज भेटेन तुला….
माळशील गजरा तु केसात….
त्या अविरत सुंगधातून मीचं बरसत होतो….
मी रोज भेटेन तुला….
तु आरश्यात स्वतःला निहारशील….
दिसेल तुला जी छबी ते माझ्या अंतरीचे प्रतिबिंब….
मी रोज भेटेन तुला….
देवाकडे तु नतमस्तक होशील….
तुझ्या प्रार्थने समवेत मी मम सदैव म्हणतो….
मी रोज भेटेन तुला….
तु ज्यावेळी हतबल होशील….
त्या आधाराच्या पाठीशी प्रेमाची ऊब सदैव मीचं….
मी रोज भेटेन तुला….
निजशील शांतपणे तु रात्री….
आभाळीचा चंद्र होऊनी मीचं शीतलता बरसतो….
निर्भय सुधीर पिंपळे
पोळले….

पोळले…
चंद्रभागेच्या वाळवंटी पाय पोळले माझे…
पोळलेल्या मनातले दुःख काय वेगळं होते…
तप्त उन्हात रणरण जळता…
तुझी आठवण बिलगुनी जाते…
तूही असेच जाळले मजला…
ग्रीष्माने जाळल्या जसा कळ्या दुपारी…
प्राणांतिक तयाचे हृदय विवळले…
माझे दुःख काही वेगळे नव्हते…
रक्ताळलेले काळीज घेऊनी मी समोर तुझ्या कोसळलो..
तु कणखर खडका प्रमाणे मौन बाळगून होतीस…
याच मौनातुनी कीतीक ऋतु कोमेजून हरपूनी गेले
वसंतातही कळ्या-फुलांनी प्राण त्यागीले होते…
अहंपणाच्या काळवंडल्या संध्याकाळी…
फुले गळुनी गेली…
निरांजन ऊजळता देवारी…
पण तुळस करपुनी गेली…
माझे ही हृदय जळूनी
उरले आत तप्त निखारे..
मृगजळ होते सारे ज्यावर हृदय भाळले होते…..
निर्भय सुधीर पिंपळे
हातचं राखून….

हातचं राखून….
हातचं राखून जगणं
मला कधी जमलेचं नाही..
प्रेम केलं अंतरंगाला स्मरून…
स्वतः आधी तुझाचं विचार स्मरून गेला प्रत्येक वेळी….
माझ्या मनास भावले ते सर्व तुझ्यावर उधळले…
स्वतःच्या इच्छांना बगल देऊन
तुला सावरणयात आनंद गवसला…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही..
हातचं राखून जगणं मला कधी जमलेचं नाही….
नेसवताना साडी प्रत्येक मिरीत जिव गुंतला….
पदरावरील मोर माझ्या संगे डोलू लागला…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
ओठावरती लाली सजताना….
गाली माझ्या रंग बरसे…अंगणीत नजरा तुझ्यावर रोखे…जीव कासावीस होतो…
तुला यातलं प्रेम दिसलेचं नाही मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
केसात तुझ्या माळला मदनबाण
वसंत फुलताना माझ्या हृदयी… त्या सूगंधात मी नहालो तुला हे कधी दिसलाचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
निजताना अलगद केलेल्या हाताच्या उशीची ऊब…
तुझ्या काळजाला शिवलीचं नाही..
काळजीने मन बेचैन राहीले हे तुला उमगले नाही..
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
तुझ्यासाठी बनवलेल्या प्रत्येक पदार्थ तु चाखताना..
तृप्तीने आलेला ढेकर तुला कधी जाणवलाचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
शब्द बोचरे माझे तुला कधी रुचले नाही..
माझ्या प्रेमाचा झरा तुला कधी तृप्त करू शकलाचं नाही….
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
काळजीने डोळया वाटे ओघळलेले पंचप्राण तुला कधी कळलेच नाही….
मला कधी हातचं राखून जगणं जमलेचं नाही…
आज देखील तुझ्यासाठी आसुसलेला जिव जिवंत ठेवतो मला…
कधी जगणं शक्य आहे का शरीराचे आत्म्याविना….
प्रेम यातलं तुला कधी उमजलेचं नाही…
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
हृदयातील प्रत्येक स्पंदनात स्वरांचा ध्यास आहे….
हे तुला न समजणे हा नियतीचा खेळ आहे….
तुला माझ्या अंतरंगातील रंग कळू शकले नाहीत….
मला हातचं राखून जगणं जमलेचं नाही….
निर्भय सुधीर पिंपळे
Samay….

Samay…
दिनकरराव…
मावळणारया दिनकरारे एक घटिका स्तब्ध हो…
काळा आड जाणारया प्रत्येक घडीला समरण कर…
सुख मोजके दुःख भारमभार….
हसत रडत झेललेलया प्रत्येक क्षणाना तु सलाम कर…
रोज नवी उमेद घेऊन पंखात भरतो प्राण मी…
तुझ्या पहिल्या कीरणा संगे करतो गगनात विहार मी…
आज जरा तु थांब ना… डोळ्यातल्या भावना जाणून घे…
हरलेलया केविलवाण्या बापाला तु कवेत घे…
उद्या मी नसेन बहुदा…माझ्या संघर्षाचा तचु शाकशीदार….
सांगशीलना माझी कहाणी ऊमलणारया प्रत्येक पाखरांना….
हारुनी जिंकणे कसास म्हणतात…त्यांचे तुच दे माझं दाखले…
निर्भय सुधीर पिंपळे
