
ईतर…

स्पर्श….

स्पर्श…..
स्पर्शुनी गेला सुगंध जाईचा…
आठवणीनी पुन्हा पंख पसरू भरारी घेतली..
तुझ्या केसात माळलेलया जाईचा गजरा आजुनही ताजा असेल…
त्याचा सुगंधी देहात भिनला आहे….
नाही आहे ते तुझं देह रूपी अस्तित्वात….
बाकी सारे होते तसेच आहे…
आजही तुझ्या अस्तित्वाच्या खुणा जाणवतात..
आजही अलगत हात ऊशी साठी पुढं सरसावतो..
आजही तुझी सावली माला न स्पर्शण जाते..
आजही रात्री तु निजलीश का पाहण्यासाठी जाग येते…
आजही तु पांघरूण ओढशील ही आशा आहे….
आजही तु माझ्या मीठीत विरघळून जाशील…
आजही तु माझ्या नेत्रात स्वताचा शोध घेशील….
आजही प्रेम अक्षय आहे…
आजही रदयाचया प्रत्येक संपनदानात स्वाराचा तरंग आहे…
त्या तरंगाचया लहरींवर जगणं सुसह्य आहे…
ही भावना अनुभवयास मीलेल रोज ही आशा अक्षय आहे…
निर्भय सुधीर पिंपळे
बाप…

बाप….
किती जळले काळीज माझे…
मांडु कसं शब्दात मी…
पाहुनी प्रत्येक बालकास…
अश्रूनी नाहलोच सदयव मी…
ठेविले मजला तुझ्या पासून दूर सदा…
प्रत्येक चांदण्या मोजीत कादली असंख्य रात मी….
आईला दिला मातुतवाचा वरदान तु…
व्याकुळलेलया बापाला वनवासाचा क्षाप का दिलास तु…
हरवलं क्षण सारं… सांडले ओंजळीतुनी….
क्षापीत कुमाराचे प्राण गुंतले त्यांच्या पिलाजवळी…
कंठ दाटूनी जीव कोमेजतो…अश्रूंचा पुर कोसळतो…
माझ्या रीदयावीना जगण्याचा अर्थ नाही ऊमजे मजला…
किती काळ वाट पाहु..
शिणले काळीज है….
प्रत्येक बालकांमध्ये दिसे निरागस रूपा तुझं….
होईल वास्तवाशी जाणीव… किंवा ठरवतील करंटा मजला…..
निसर्गाला ठाऊक आहे कीती तळमळला बाप तुझा..
जाणशील शबदरूपी मन माझे….
असेल किंवा नसेल मी… खरंपणा माझा कसा मांडु तुझ्या पुढे…
आकाशगंगेतुन बरसेल माझ्या खरेपणयाचे दाखले…
एकच मागणं देवा…घाल पदरात माझ्या…
माझ्या लेकरांच्या पोटी जन्मास घाल माला….
जगु दे क्षण सुखाचे चार घतका तरी…
रक्ताताळलेलया काळजाला मीलुदे मायेची सावली….
निर्भय सुधीर पिंपळे
राजहंस…

राजहंस….
आज खूप शांत वाटते…
स्वतःशी नव्याने भेट घडली…
निशपाप मनाशी हितगुज झाली…
दुनियात प्रेम शोधत राहिलो…
निष्ठुर मनाना ठोकावत राहिलो…
प्रत्येक ठिकाणी पायदली तुडवीत गेलो…
बदकांच्या थवेत राजहंस कोणाला समजलाच नाही…
स्वताच्या अंतरंगात डोकावून पाहिले…
आणि आज नव्याने स्वतःचयाच प्रेमात पडलो….
निर्भय सुधीर पिंपळे
आठवणी….

मी….

