स्पर्श…..

स्पर्शुनी गेला सुगंध जाईचा…
आठवणीनी पुन्हा पंख पसरू भरारी घेतली..
तुझ्या केसात माळलेलया जाईचा गजरा आजुनही‌ ताजा असेल…
त्याचा सुगंधी देहात भिनला आहे….
नाही आहे ते तुझं देह रूपी अस्तित्वात….
बाकी सारे होते तसेच आहे…
आजही तुझ्या अस्तित्वाच्या खुणा जाणवतात..
आजही अलगत हात ऊशी साठी पुढं सरसावतो..
आजही तुझी सावली माला न स्पर्शण जाते..
आजही रात्री तु निजलीश का पाहण्यासाठी जाग येते…
आजही तु पांघरूण ओढशील ही आशा आहे….
आजही तु माझ्या मीठीत विरघळून जाशील…
आजही तु माझ्या नेत्रात स्वताचा शोध घेशील….
आजही प्रेम अक्षय आहे…
आजही रदयाचया प्रत्येक संपनदानात स्वाराचा तरंग आहे…
त्या तरंगाचया लहरींवर जगणं सुसह्य आहे…
ही भावना अनुभवयास मीलेल रोज ही आशा अक्षय आहे…

निर्भय सुधीर पिंपळे

2 Replies to “स्पर्श…..”

Leave a reply to nirbhayridaya Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started